जळगाव : गेल्या वर्षभरात शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ््या ठिकाणी जप्त केलेला १ कोटी ८१ लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दोन दिवसात नष्ट करण्यात आला.अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी कारवाई करून गुटखा जप्त केला होता. हा सर्व माल प्रशासनाच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता. हा जप्त गुटखा नष्ट करण्यासंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बुधवार, २९ मे रोजी तो नष्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. यात जप्त केलेल्या गुटख्यापैकी चार मिनी ट्रक गुटखा बुधवारी निमखेडी शिवारात असलेल्या घनकचरा प्रकल्पानजीक नष्ट करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा उर्वरित दोन ट्रॅक्टर, एक डंपर व दोन मोठ्या ट्रकमध्ये भरुन नष्ट करण्यात आला.सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
एक कोटी ८१ लाखाचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:17 PM