शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट

By सुनील पाटील | Published: April 21, 2023 7:53 PM

शासकीय पैशाचा अपव्यय

जळगाव :  पाचोरा रोड ते छत्रपती संभाजी नगर रस्ता अस्तित्वात नाही. मात्र, त्यासाठी ८५ कोटींतून १० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. शिरसोली रस्त्यावरील जुना जकात नाका, गितांजली केमिकल्स ते सुप्रीम कॉलनी अशा तीन किलोमीटर अंतरासाठी हा निधी मंजूर झाला आहे. मुळात हा भाग ग्रीन झोन आहे.

त्याला शासनाने अजून मान्यताच दिलेली नाही. त्याशिवाय कार्यादेश व डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर पुन्हा कॉक्रीटीकरण करुन त्यावर पैसा खर्च केला जात आहे. नगरसेवक व जळगावकरांच्या भावनांशी कागदोपत्री खेळ सुरू असल्याची टीका ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत केली.

महापालिकेची महासभा शुक्रवार, दि. २१ एप्रिल रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी, प्रत्यक्षात मिळालेला निधी व त्यातून झालेली कामे याचा प्रवास मांडत असताना चुकीच्या पद्धतीने नियोजन झाल्याने पैसा कसा वाया जात आहे, याचे पुरावे नितीन लढ्ढा यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सभेत दिले. 

कसा होतोय पैशाचा अपव्यय...नितीन लढ्ढा यांनी काही महत्त्वाच्या रस्त्यांचे पुरावे दिले. त्यात शासनाने आता पुन्हा रस्त्यांसाठी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नेरी नाका ते अजिंठा चौक या एक किलीमोटर रस्त्यासाठी ३.५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याच कामासाठी ३८ कोटींच्या निधीतूनही टॉवर चौक ते अजिंठा चौक डांबरीकरणाचा कार्यादेश झालेला आहे. निमखेडी ते सुरत रेल्वे गेट, सुरत रेल्वे गेट ते शिवाजी नगर-टॉवर चौक, आसोदा रोड काँक्रीटीकरणासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आधी ३८ कोटींच्या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरणाचे निम्मे काम झाले आहे. काम अंतिम टप्प्यात असताना मक्तेदाराला काम थांबविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. टॉवर चौक ते बालाजी मंदिर या रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण झाले. आता त्यावर पुन्हा काँक्रीटीकरण केले जाणार आहे. नुक्कड चौक ते लांडोरखोरी या पाच कोटी रुपयांच्या रस्त्याचे कार्यादेश झालेले आहेत. यातील काही रस्ता डांबरीकरण झालेला आहे.आता या रस्त्याचेही काम थांबविण्याचे आदेश झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव