आॅनलाईन लोकमतजळगाव दि,४: पंधरा दिवसापूर्वी दुचाकी अपघातात जखमी झालेल्या चेतन बाळू तायडे (वय १० रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या बालकाचा बुधवारी सकाळी पावणे आठ वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. चेतन याच्या मृत्यूने सुप्रीम कॉलनीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाळू शामराव तायडे (वय ३७) हे पत्नी सुनीता व मुलगा चेतन अशांसह २४ मार्च रोजी सांगवी, ता.यावल येथे नातेवाईकाच्या कानटोचणीच्या कार्यक्रमाला गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुचाकीने घरी यायला निघाले असता वढोदा गावाजवळ समोरुन येणाºया दुचाकीची तायडे यांच्या दुचाकीला धडक बसली होती. या अपघातात तायडे, त्यांच्या पत्नी व मुलगा असे तिघं जखमी झाले होते. तायडे यांची हनुवटी तुटली होती तर पत्नीला हातापायाला व डोक्याला मार लागला होता. मुलगा चेतन याच्या डोक्यालाही गंभीर मार लागला होता.पंधरा दिवस मृत्यूशी झुंजया अपघातानंतर तायडे कुटुंबातील तिघांना शहरातील खासगी दुकानात दाखल करण्यात आले होते. बाळू तायडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांची दवाखान्यातून सुटका झाली होती तर पत्नी सुनीता व मुलगा चेतन यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते दवाखान्यातच होते. पंधरा दिवसाच्या डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर चेतन याची बुधवारी सकाळी प्राणज्योत मालवली.
अपघातातील जखमी झालेल्या जळगावच्या दहा वर्षीय बालकाचा अखेर मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:34 PM
पंधरा दिवसापूर्वी दुचाकी अपघातात जखमी झालेल्या चेतन बाळू तायडे (वय १० रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या बालकाचा बुधवारी सकाळी पावणे आठ वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. चेतन याच्या मृत्यूने सुप्रीम कॉलनीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे सुप्रीम कॉलनीत शोककळा पंधरा दिवसापूर्वी झाला होता अपघात आई, वडीलही झाले होते जखमी