अमळनेर : शहरात नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी तिरंगा चौकात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलने १००.३ फूट स्तंभाचे ध्वजारोहण करण्यात आले.लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, उपनगराध्यक्ष विनोद लंबोळे, विरोधी पक्ष गटनेते प्रवीण पाठक, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला.यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, माधुरी पाटील, ऍड तिलोत्तमा पाटील, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, नगर अभियंता अमोल भामरे हजर होते. प्रास्ताविक संजय चौधरी यांनी केले.अनेकांनी या राष्ट्रीय सोहळ्याचा आनंद घेतला.दिवसभर सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. शहराबाहेर तीन चार कि. मी. अंतरावरून तिरंगा दिमाखात फडकताना दिसून येतो.तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी, तलाठी हजर होते.मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयात ग. स. बँकेचे माजी चेअरमन झाम्बर राजाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाचालक सुहासिनी पाटील, श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील हजर होते.गांधलीपुरा शाळेत चेअरमन श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील हजर होते.
अमळनेरात १०० फुटी तिरंगा फडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 5:49 PM