बीड : कर्जबाजारी, नापीकी, दुष्काळ या विवंचनेतून शेतकरी आपली जीवणयात्रा संपवित आहेत. यामुळे त्यांच्या कुटूंब व मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षीत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केली.औरंगाबाद, जालना येथील दुष्काळाची पाहणी केल्यांनतर बुधवारी बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. सकाळी खापरापांगरी आणि पालवण येथील छावण्यांना त्यांनी भेट दिली. यावेळी अमोल भातोळकर, शांतीराम कुंजीर, गंगाधर काळकुटे, अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, प्रा. यशवंत गोसावी, राहुल वाईकर, अशोक सुखवसे, सुहास पाटील, रामेश्वर हांगे, एम. बी. हांगे यांची उपस्थिती होती.ते म्हणाले, उपाययोजनांसाठी मंत्र्यांना भेटणार असून, दानशूर लोकांची मदत घेऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा देणार आहे. मराठा आरक्षणासारखेच तीव्र आंदोलन दुष्काळी प्रश्नाबाबत उभे करू, असा ईशाराही त्यांनी दिला. नागरीकांनीही दुष्काळी परिस्थितीत उत्सव साजरी करू नयेत. यातून बचत होणारी रक्कम दुष्काळग्रस्तांना द्या. आणि ही मदत पारदर्शकपणे जावी, यासाठी आपण एक ट्रस्टही उघडणार असल्याचे सांगितले. हा दौरा कुठल्याही राजकीय पक्षाविरोधात नसून सर्वसामांसाठी आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
कृषी विद्यापीठासाठी मुख्यमंत्र्यांना धुळ्यातून 100 पत्रे
By admin | Published: September 16, 2015 11:57 PM