जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. मिटींग भत्यामध्ये १०० रुपयांनी वाढ करण्यात आली. सभासदांकडून स्टॅम्प पेपर घेण्याचा विषय वगळता अन्य सर्व विषय मंजूर करण्यात आले.माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार ५ रोजी दुपारी १ वाजता लेवा बोर्डीग सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शालीग्राम भिरूड होते. यावेळी उपाध्यक्ष शुभांगिनी महाजन, सचिव संजय निकम, वासुदेव पाटील, संचालक गजानन गव्हारे, भीमराव सपकाळे, मनोहर सूर्यवंशी, अलका पाटील, अजय देशमुख, प्रकाश पाटील, पुरुषोत्तम पाटील, जगदिश पाटील, नंदकुमार पाटील, रवींद्र बाविस्कर, शरद बन्सी, हेमंत चौधरी, निंबा पाटील, शैलेश राणे, जयंत चौधरी, राजेंद्र चौधरी, संदीप पाटील, वामन पाटील, राजेंद्र महाजन उपस्थित होते.लेखा परिक्षणात घेतलेल्या शेºयानुसार सभासदांना कर्ज अदा करताना सभासदांकडून स्टॅम्प पेपर घेण्याबाबत विषय मांडण्यात आला. या विषयाला सभासदांनी विरोध केला. सभासदांच्या विरोधानंतर हा विषय नामंजूर करण्यात आला.सभासद कल्याण निधीसाठी प्रत्येकांकडून ५०० रुपये घेण्याबाबतचा विषय मांडण्यात आला. या विषयाला सभेत सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र सभेतील अन्य सभासदांनी हा विषय मंजूर केला.यावेळी स्थानिक हिशोब तपासणीस व वैधानिक लेखा परिक्षकाची नेमणुक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील वर्षापासून मिटींग भत्ता ५०० रुपयांवरून ६०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाभरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगावात शिक्षक सभासदांच्या भत्यामध्ये १०० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 3:29 PM
जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
ठळक मुद्देजिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या पतपेढीची सभास्टॅम्प पेपरचा विषय वगळता सर्व विषय मंजूरसभासद कल्याण निधीला सभासदांचा आक्षेप