भुसावळ : तालुक्यामध्ये पावसाने कमबॅक केल्यामुळे खरीप हंगामाची जवळपास १०० टक्के पेरणी झाली आहे. याकरिता आवश्यक असलेला युरिया खताचा साठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. एकूणच स्थितीबाबत समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यामध्ये एकूण २६ हजार ३४७ हेक्टर जमीन पेरणीलायक क्षेत्र असून १०० टक्के पेरणी झालेली आहे. सर्वात जास्त पेरा ६७ टक्के इतका हा कापसाचा झालेला आहे.
पिके लागवड टक्केवारी
ज्वारी १९९७ ७.५
मका १७७३ ६.७२
तूर ६४४ २.४४
उडीद १०९३ ४.१४
भुईमूग २०९ ०.८
सोयाबीन १४११ ५.३५
कापूस बागायत ६३८७ २४.२४
कापूस जिरायत ११,३९९ ४३.२६
दोन हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध
तालुक्यात एकूण ४ हजार ४७३ मेट्रिक टन इतक्या प्रमाणात युरियाची आवश्यकता आहे. यापैकी २ हजार ६३० मेट्रिक टन युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे. तसेच ३५० मेट्रिक टन युरिया हा कृषी केंद्रावर उपलब्ध आहे. युरियासह इतर बी-बियाणे खरेदीसाठी तालुक्यामध्ये एकूण ६० कृषी केंद्रे उपलब्ध आहे. २८ जुलैपर्यंत तालुक्यात २१७.५४ मिलिमीटर इतके पर्जन्यमान झालेले आहे.