पारोळा, जि.जळगाव : सर्वांना आरोग्य लाभावे तसेच शेतकरी आणि व्यापारी यांच्या समृद्धीसाठी तालुक्यातील सावखेडा होळ येथील संत इंद्रदेव महाराज यांच्या आश्रमात १० ते १६ जुलैदरम्यान १०८ कुंडीय महायज्ञ तथा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुमारे ५ ते ६ लाख भाविक उपस्थित राहतील, अशी माहिती इंद्रदेव महाराज यांनी येथील आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१०८ कुंडीय महायज्ञाचा उद्देश सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, वेळेवर भरपूर पाऊस व्हावा, असा असल्याचे इंद्रदेव महाराज यांनी सांगितले. १० जुलै रोजी सकाळी १० वाजता बालाजी मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.देशभरातून येणाºया भाविकांची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू आहे. सध्या कानपूर, राजस्तान येथील ६० ते ७० मजूर यज्ञमंडप उभारणीचे काम करीत आहेत.महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयर्वेद आधारित यज्ञ केला जात आहे, असे इंद्रदेव महाराज यांनी सांगितले.
पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथे १०८ कुंडीय महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:42 AM
सर्वांना आरोग्य लाभावे तसेच शेतकरी आणि व्यापारी यांच्या समृद्धीसाठी तालुक्यातील सावखेडा होळ येथील संत इंद्रदेव महाराज यांच्या आश्रमात १० ते १६ जुलैदरम्यान १०८ कुंडीय महायज्ञ तथा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देआरोग्य आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपक्रम५ ते ६ लाख भाविकांची उपस्थिती राहणार