शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली 

By विलास बारी | Published: September 09, 2023 6:37 PM

यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे.

जळगाव : वाढलेले उत्पन्न आणि कोविडनंतर स्वतंत्र वाहनाची निर्माण झालेली गरज यामुळे जळगाव जिल्ह्यात तब्बल एका वर्षात ११ लाख ८३ हजार वाहनांची खरेदी व विक्री झाली आहे. यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे.

पूर्वी घरासमोर वाहन हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. मात्र, कोरोनानंतर स्वत:चे वाहन असावे, ही गरज झाल्यामुळे अनेकांकडून रोखीने, तसेच बँक लोनच्या माध्यमातून नागरिकांकडून दुचाकी व चारचाकी खरेदी केली जात आहे. जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयात सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील वाहनांच्या नोंदणीच्या आकडेवारीवरून सन २०१९ मध्ये वर्षाला ९ लाख ४८ हजार १९ वाहनांची विक्री होत होती. ती २०२३ मध्ये ११ लाख ८३ हजार ८५२पर्यंत पोहोचली आहे. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूलदेखील उपलब्ध होत आहे.

कमी ‘ईएमआय’चा पर्याय -विविध संस्था, बँकांकडून कमी ईएमआयचे आमिष दाखविले जात आहे. वाहन ही काळाची गरज असल्याचे ओळखून अनेकजण कर्ज काढून कमी ईएमआयवर दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करीत आहेत.

कोरोनानंतर चारचाकींची संख्या वाढली -कोरोना काळात दळणवळणाच्या सुविधाही प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे प्रवासात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सामाजिक कार्यातील सहभाग, तसेच नातेवाइकांच्या भेटीगाठींवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी स्वत:चे वाहन खरेदी करण्याचा पर्याय निवडला होता. २०१९ मध्ये ४५ हजार ७२९ मोटार कारची विक्री झाली होती. २०२३ मध्ये हेच प्रमाण ७१ हजार २०३पर्यंत पोहोचले आहे.

दुचाकीची किंमत ८० हजारांपासून, चारचाकी ५ लाखांपासून पुढे -दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री वाढल्यामुळे उत्पादक कंपन्यांनीदेखील किमतींमध्ये वाढ केली. सध्या दुचाकीची किंमत ही ८० हजारांच्या पुढे, तर चारचाकी वाहनाची किंमत ही ५ लाखांच्या पुढे आहे.

९५ टक्के ग्राहकांकडून ‘ईएमआय’चा वापरदुचाकी : दुचाकी खरेदीसाठी अनेक बँका, विविध कपंन्यांकडून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहन खरेदी करणाऱ्यांना कमीत कमी ईएमआय आकारला जातो. त्यामुळे ९० ते ९५ टक्के ग्राहक दुचाकी ही ईएमआयवर खरेदी करतात.

चारचाकी : चारचाकी वाहनांसाठी कमीत कमी ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. ही सुविधा परवडणारी वाटत असल्याने अनेकजण चारचाकी खरेदी करीत असतात. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात ७१ हजार २०३ कारची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यातील वाहनेवाहन २०१९ --२०२३--- तुलनात्मक वाढदुचाकी ७५५१९६ --९३३९६९--१७८७७३कार ४५७२९--७१२०३--२५४७४ऑटोरिक्षा ३१४२४--३३१६५--१७४१मिनी बस ६१६--६७५--५९स्कूल बस ५५० --६९६--१४६रुग्णवाहिका २५६--३४३--८७ट्रक, लाॅरी १००६५ --१४८१२ --४७४७डिलिव्हरी व्हॅन २६०३८--३२९७६--६९३८ट्रॅक्टर ३६८१२-- ५१९५१--१५१३९इतर वाहने १८८६ -- २६३९--७५३ 

टॅग्स :carकारJalgaonजळगावbikeबाईक