चाळीसगाव, जि.जळगाव : शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील भिलकोटमधील आरोपी प्रवीण रतन सोनवणे याच्याकडून ११ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा अट्टल मोटारसायकल चोर असून, अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायकली निघण्याची शक्यता आहे.जप्त केलेल्या १० गुन्ह्यातील मोटारसायकली ह्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत. पोलिसांना गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधीक्षक नजीर शेख, केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी सदर गुन्ह्याच्या तपासबाबत पोलीस उपनिरीक्षक राजेश घोळवे, बापूराव भोसले, संंभाजी पाटील, विजय शिंदे, राहुल पाटील, नितीन पाटील, प्रेमसिंग राठोड, गोवर्धन बोरसे, गोपाळ बेलदार, प्रवीण सपकाळे, तुकाराम चव्हाण, राहुल गुंजाळ, सुनील राजपूत यांच्या पथकाने भिलकोटमध्ये जाऊन आरोपीच्या शोध घेऊन सापळा रचून आरोपीसह मोटारसायकली ताब्यात घेतल्या.या गुन्ह्याची त्याने कबुली देऊन ११ मोटारसायकली झोडगे तालुका मालेगाव परिसरातील लोकांकडे गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक विजय शिंदे हे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
११ मोटार सायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 9:52 PM
चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील भिलकोटमधील आरोपी प्रवीण रतन सोनवणे याच्याकडून ११ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा अट्टल मोटारसायकल चोर असून, अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायकली निघण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देचाळीसगाव पोलिसांची कारवाईआरोपी भिलकोटमधीलआरोपीकडून अजून मुद्देमाल मिळण्याची शक्यता