गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : श्री दत्त जयंतीनिमित्त भरत असलेली व देशात घोड्याच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता.शहादा, जि.नंदुरबार) येथील चेतक फेस्टिवलमध्ये सामील होण्यासाठी सुमारे ३५० किलोमीटर अंतरा घोड्यावर स्वार होऊन विक्रम नोंदविण्यासाठी अकोला येथील जसनगरा भागातील राजवीरसिह नागरा हा ११ वर्षे १० महिने वयाचा मुलगा निघाला आहे.त्याच्यासोबत घोड्याची देखरेख करणारे इमरान खान, प्रदीप चोखंडे, हर्ष नागरा, शहजाद मिर्झा, हुसेन मामाजीवाला, मो.इकबाल हे आहेत. हे सर्व १२ डिसेंबरपासून अकोला येथून प्रवासाला निघाले आहेत. त्यावेळेस अकोला येथील पालकमंत्री रणजित पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.दररोज ५० किलोमीटरचा प्रवास हा घोडा करीत आहे. यासाठी सकाळी आठ वाजता प्रवासाला सुरुवात करतात. ताशी सात किलोमीटर अंतरावर ब्रेक घेतला जातो. यासाठी घोड्याला साडेचार किलो खाद्य दिले जाते.११ वर्षीय मुलगा राजवीरसिह हा २२ रोजी ह्या घोड्यासह सारंगखेडा यात्रेत चेतक फेस्टिवलला पोहचेल. मंगळवारी हा घोडा जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे रात्री आठ वाजता पोहोचला.याबाबत घोड्याची देखरेख करणाऱ्या हर्ष नागरा यांची प्रतिक्रिया घेतली असता आतापर्यंत ३५० किलोमीटरचा प्रवास करून यात्रेत पोहचण्याचा ११ वर्षीय मुलाचा विक्रम करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. यात आमच्यासोबत घोड्याची देखरेख करणारे पथक, घोड्याची व्यवस्था गाडीसोबत आहे, तर ठिकठिकाणी आमच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.घोड्याचे वैशिष्ट्य‘बाज’ नावाचा हा घोडा असून, तो मारवाड जातीचा आहे. त्याची उंची ६५ इंच आहे, तर वजन साडेपाचशे किलो आहे. या ‘बाज’ला दररोज साडेचार किलो खाद्यात चना व जवचा वापर केला जातो.आज अमळनेरातअकोला येथून घोडेस्वारी करत सारंगखेडा यात्रेसाठी निघालेला राजविहीर कालरा १९ रोजी सायंकाळी साडेपाचला अमळनेर शहरात दाखल होणार आहे. अमळनेर येथे एक दिवस रात्री मुक्काम करून २० रोजी तो सारंगखेड्याकडे रवाना होणार आहे. घोडेस्वारीचा छंद जोपासत प्राणी मात्रांबाबत जनजागृती करण्यासाठी तो हा दौरा करीत आहे. नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून खा.शि मंडळाचे माजी अध्यक्ष गुलविरसिंग कालरा यांच्या मुंबई गल्लीजवळील निवासस्थानी तो येणार आहे व याच ठिकाणी त्याचा रात्रीचा मुक्काम असेल.
अकोला ते सारंगखेडा ११ वर्षीय मुलाचा घोड्याने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:40 AM
गोपाळ व्यास बोदवड , जि.जळगाव : श्री दत्त जयंतीनिमित्त भरत असलेली व देशात घोड्याच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता.शहादा, ...
ठळक मुद्देसारंगखेडा येथील ‘चेतक फेस्टिवल’साठी ३५० किलोमीटरची होतेय रपेटसाडेपाचशे किलोच्या बाज घोड्याला दररोज लागतेय साडेचार किलो खाद्य‘बाज’ आज पोहचणार अमळनेरात