शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

११ वर्षांची प्रतीक्षा एकाच दिवसात पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:16 AM

एसपींचा धाडसी निर्णय : आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या सुनील पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सरकारी काम अन् ...

एसपींचा धाडसी निर्णय : आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या

सुनील पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी शासकीय कामाची आपल्याकडे पद्धत रूढ झालेली आहे. ज्याचा कोणी वाली नाही त्याची तर अवस्था यापेक्षाही बिकट होते. पोलीस खात्यात संघटना नसल्याने आवाज उठवता येत नाही, त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याच मुद्द्याला स्पर्श केला व तब्बल अकरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या १६१ कर्मचाऱ्यांना एकाच दिवसात नियुक्ती देऊन महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला.

दरम्यान, पोलीस कर्मचारी असो किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात डॉ. प्रवीण मुंढे हे अग्रेसर असून, महाराष्ट्रातील पहिले पोलीस अधीक्षक ठरले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनीच एका कार्यक्रमात हे जाहीर केले आहे.

प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के जागा भरण्यास पोलीस अधीक्षकांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. २०१०पासून जिल्ह्यात अनेक पोलीस अधीक्षक बदलले मात्र केवळ शिफारशींनुसार पाच ते दहा कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. आपल्या हक्कांपासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचे डॉ. मुंढे यांच्या निदर्शनास आले. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. मुंढे यांनी स्वतः जातीने यात लक्ष घातले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थापना प्रमुख दीपक जाधव यांना सोबत घेऊन रखडलेली ही प्रक्रिया काही दिवसात पूर्ण केली. २०१५पर्यंत रखडलेल्या सर्व बदल्या एकाच दिवसात मार्गी लावल्या.

जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या ५७५ कर्मचाऱ्यांपैकी यंदा १६१ जणांना आंतरजिल्हा बदलीनुसार जिल्ह्यात येण्यास स्वीकृती मिळाली असून, त्यापैकी ६२ जण हजरही झाले आहेत.

जिसका कोई नही उसका भगवान है !

पोलीस दलात आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांकडून ठरलेल्या प्रकियेनुसार अर्ज करण्यात आले. प्रत्येक वर्षी पात्र ५ टक्के याप्रमाणे पात्र कर्मचारी आंतरजिल्हा बदलीनुसार घेेणे अपेक्षित असताना याकडे तत्कालीन पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. तसेच अर्ज करणाऱ्यांपैकी मंत्री, राजकीय पुढारी यांच्यासह इतरांच्या शिफारशीनुसार कर्मचारी घेतले गेले. अशाच पध्दतीने २००१ ते २०१० दरम्यान आलेल्या प्रत्येक पोलीस अधीक्षकांनी केवळ शिफारशींनुसार दरवर्षी १५ ते २० कर्मचारी घेतले, इतरजण प्रतीक्षेतच राहिले. या कर्मचाऱ्यांना कोणीच वाली नव्हते. डॉ. प्रवीण मुंढे हेच भगवान रुपी या कर्मचाऱ्यांचे वाली ठरले, परंतु ते हे मानायला तयार नाहीत, आपण केवळ आपले कर्तव्य बजावले, असे मानतात.

केवळ रजिस्टर नोंदी

२०१०मध्ये असलेल्या पोलीस अधीक्षकांनी एक स्वतंत्र रजिस्टर तयार करुन आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची त्यात नोंद घेतली. मात्र, आंतरजिल्हा बदलीपात्र कर्मचाऱ्यांना घेण्यात आले नाही. तेव्हापासून ते आधीच प्रलंबित असलेले अर्ज व यात प्रत्येक वर्षी पात्र कर्मचारी करत असलेले अर्ज यामुळे यादी लांबलचकच होत गेली. मात्र, अधिकारात असतानाही एकाही पोलीस अधीक्षकाने संबंधित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवली नाही. डॉ. मुंढे यांनी आंतरजिल्हा बदली, पदोन्नती, अनुकंपावर नोकरीत सामावून घेण्याचे धाडसी निर्णय घेतले. त्याशिवाय चूक केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या दोषांसह स्वीकारुन खरी पालकत्वाची भूमिका निभावली आहे.

कोट....

बदली प्रक्रिया कोणतीही असो शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच करावी लागते. आपण आपले कर्तव्य बजावले आहे. प्रत्येक वर्षी पाच टक्केप्रमाणे कर्मचारी घेण्यास मुभा दिली आहे. त्याचा आधार घेऊन ही प्रक्रिया राबवली. प्रत्येक वर्षी याच पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही.

- डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक.

अशी आहे कर्मचाऱ्यांची संख्या

एकूण प्रलंबित : ५७

स्वीकृती दिलेले कर्मचारी : १६१

हजर झालेले कर्मचारी : ६२

स्वीकृती रद्द केलेले कर्मचारी : २१

हजर न झालेले कर्मचारी : ७८

एकूण शिल्लक प्रस्ताव : ४१४

वर्षनिहाय शिल्लक प्रस्ताव

वर्ष संख्या

२०१५ ५२

२०१६ ८५

२०१७ १०६

२०१८ १००

२०१९ ४३