जळगाव : बीएचआर पतसंस्थेत ११०० कोटींचा घोटाळा असल्याचा आपला अंदाज असल्याची माहिती देत २०१८ मध्ये केंद्राचे चौकशीचे आदेश असतानाही तत्कालीन राज्यसरकारने चौकशी केली नव्हती, असा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. संस्थेच्या जमीनी त्यावेळी मातीमोल भावात विकत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे ठेवीदारांच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली, तेव्हा आपल्यावर दबाव असल्याचे त्यांनी मान्य केले होते, आमच्यात शाब्दीक चकमक झाल्याचेही खडसे यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्याचे आदेश असताना हा तपास जळगाव स्थानीक गुन्हेशाखेकडे देण्यात आला, त्यावेळच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता. असेही खडसे म्हणाले. यात जमीनीचे गैरव्यवहार झालेले आहेत. त्यात जामनेरची प्रॉपट्री आहे, जळगाव, मुंबईची प्रॉपट्री असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घोटाळ्यात मोठी राजकीय नावे तपासात समोर येतीलच, आपण आता ती उघड करणार नाही, असेही खडसे म्हणाले.