कजगाव (ता. भडगाव) : येथे कोरोना लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले. कजगाव पत्रकार मित्र मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्राच्या सहकार्याने शिबिर झाले. शिबिरात कजगाव व परिसरातील तब्बल ११०० जणांनी लस घेतली. कजगाव येथे आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, दिनेश पाटील, पत्रकार नितीन सोनार यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने लसीकरण यशस्वी करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रशांत पाटील, पत्रकार प्रमोद ललवाणी, संजय महाजन, नितीन सोनार, प्रशांत पाटील, अमीन पिंजारी, दीपक अमृतकर, लालसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, प्रकाश गवळी, आरोग्य कर्मचारी विजय दाभाळे, रोहित महाले, नलू परदेशी, सुवर्णा मोरे, कांता मोरे, सुरेखा गढरी, जि. प. कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन, शिक्षक सुनील गायकवाड, प्रवीण महाजन, कर्तार पाटील, धर्मराज पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील पवार, रघुनाथ जाधव, रवींद्र मालचे, भुरा सोनवणे, संजय पाटील, स्वयंसेवक आशिष वाणी, सारंग राजपूत, हर्षल महाजन, मयूर गुजराथी, नीरज धाडीवाल, रतन महाजन, विजय गायकवाड, अंगणवाडी सेविका सुनंदा महाजन, अर्चना महाजन, शीतल विसपुते, मीना पगारे, विजया तिवारी, विमल महाजन, छाया महाजन, लता शिरसाठ, शारदा बोरसे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन
कजगाव येथे आयोजित महालसीकरण शिबिरात झालेली गर्दी.