लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या रविवारी थेट ११ हजार १५५वर पोहोचली आहे. रविवारी शहरात नवे २८४ रुग्ण आढळून आले असून, तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची वाढलेली संख्या चिंता वाढविणारी आहे. शासकीय यंत्रणाही कमी पडत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने रुग्णांनी जायचे कुठे, असाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील बाधितांची संख्या ८५ हजार ४८३ झालेली आहे. रविवारी पुन्हा १४ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात चोपडा तालुक्यातील ५१ वर्षीय पुरुष, ४८, ६५ व ७४ वर्षीय महिलेच्या मृतांमध्ये समावेश आहे. यासह जळगाव शहर ३, यावल, धरणगाव प्रत्येकी २, भुसावळ, अमळनेर, रावेर या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये धरणगाव तालुक्यातील एका ३३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. जळगाव शहरातील ३२० रुग्णांना बरे झाल्यानंतर रविवारी घरी सोडण्यात आले. शहरात कोरोनाचा संसर्ग थांबत नसून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रुग्णसंख्या २३,१८५वर पोहोचली आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांची संख्या ३७३ वर पोहोचली आहे. यात एकट्या जळगाव शहरात २९११ सक्रिय रुग्ण आहेत.
सक्रिय रुग्ण असे
जळगाव : ३१८९
चोपडा : २३५६
भुसावळ : १०९७
धरगणाव ५९३
अमळनेर : ५४३
हे भाग हॉटस्पॉट
पिंप्राळा. खोटेनगर, अयाेध्यानगर. मेहरूण, आशाबाबा नगर, रामेश्वर काॅलनी अशा काही भागा प्रामुख्याने रुग्ण समोर येत आहेत. सातत्याने रुग्णांची नोंद या भागात केली जात आहे.