जळगाव : मनपात एकाच विभागात तीन पेक्षा अधिक वर्ष झालेल्या 116 लिपिक व 184 शिपायांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या. सायंकाळी हे आदेश देण्यात आल्यानंतर सोमवारी मनपा आवारातच हे आदेश पाहण्यासाठी कर्मचा:यांची गर्दी झाली होती. टप्प्याटप्प्याने बदली प्रक्रिया राबविली जात असून मंगळवारी सर्व अभियंत्यांच्या तर त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील कर्मचा:यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मनपात एकच अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात असल्याने कामात शिथिलता आली असून नागरिकांच्या अडवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. तसेच दुस:या कर्मचा:याला त्या विभागातील, टेबलवरील प्रकरणांची माहिती नसल्याने माहिती दडविण्याचे प्रकारही होतात. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी एका विभागात 3 वर्ष झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचा:यांची बदली करण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यासोबतच 3 वर्ष न झालेल्या मात्र वादग्रस्त ठरलेल्या कर्मचा:यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत. त्याचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. त्यात विविध विभागातील तब्बल 116 लिपिक व 184 शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. आस्थापना अधीक्षकांना ठेवले दूरया बदली प्रक्रियेसाठी आस्थापना विभागाकडून एकाच विभागात तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचारी, अधिका:यांची यादी उपायुक्तांकडे मागविण्यात आली. मात्र बदली करताना आस्थापना अधीक्षकांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपायुक्त कार्यालयातच हे आदेश तयार करण्यात येऊन ते वाटपासाठी आस्थापना विभागाकडे देण्यात आले. आज अभियंत्यांच्या बदल्यामंगळवारी अभियंत्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात नगररचना विभागात वर्णी लावण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे समजते. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग, दवाखाने विभागातील कर्मचा:यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. वादग्रस्त अधिकारी व कर्मचा:यांच्या उचलबांगडीचे संकेत दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.आदेशांमुळे समजले लिपिक व शिपाई कोणअनेक विभागात शिपाईच लिपिकाचे काम करीत आहेत. त्यामुळे सोमवारी जेव्हा लिपिक व शिपायांच्या बदल्यांचे दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आले. त्यानंतर लिपिकाचे काम करणारे शिपाई असल्याचे लक्षात आले. मनपात अनेक वर्षापासून पदोन्नतीच झालेल्या नसल्याने पात्रता असूनही कर्मचा:यांना संधी मिळालेली नाही.
116 लिपिक, 184 शिपायांच्या बदल्या
By admin | Published: April 18, 2017 1:43 AM