जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी, मराठी शाळेत २५ टक्के या प्रमाणात नर्सरी व इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येता असतो़ त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेयासाठी जिल्ह्यातील २६१ शाळांनी नोंदणी केली होती़ त्यानंतर या शाळेतील मोफत प्रवेशाच्या ३८१७ जागांसाठी मे महिन्यापासून प्रवेश फेरीला सुरूवात झाली़ पहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला़ त्यापैकी १२१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले़दुसºया फेरीसाठी ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीनंतर फक्त ७९८ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ तिसºया फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या ८१७ विद्यार्थ्यांपैकी ५४१ जणांनी प्रवेश घेतला़ सर्वाधिक जागा रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाकडून चौथी फेरी राबविण्यात आली़ यात १६५ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यात आला़ मात्र, ७३ विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला़ अखेर पाचवी फेरी आॅक्टोबर महिन्यात राबविण्यात आली़ यामध्ये ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला़ परंतू, फक्त १६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला़ त्यामुळे एकूण २६१ शाळांमध्ये ३८१७ जागांवर फक्त २६४२ जागा भरण्यात आल्या आहेत़ यंदाही आरटीईच्या जाचक अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित रहावे लागले आहे़ शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर जिल्ह्णातील १९६ विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी अपात्र ठरविण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना देण्यात विलंब होता, म्हणून अनेक शाळा सुध्दा आरटीई प्रवेशासाठी नाकमुरडताना दिसून आल्या़ तर ८८९ विद्यार्थ्यांचे पालक हे शाळांपर्यंत पोहोचलेच नाही़ त्यामुळे पालकांमध्येही प्रवेशासंदर्भात उदासिनता दिसून आली़ दरम्यान, सहामाही परीक्षा संपविण्यावर आल्या असून शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरूच ठेवलेली आहे़
जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या ११७० जागा रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:15 PM
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़
ठळक मुद्देजिल्ह्यातील २३१ शाळांमध्ये मिळतो प्रवेशपहिल्या फेरीत १५२६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितदुसऱ्या फेरीत ११५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित