शेंदुर्णी, ता.जामनेर : पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी ८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ शिवसेना १ अपक्ष १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच नगरसेवक पदासाठी ११९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात भारतीय जनता पार्टी ६० राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ३५ शिवसेना ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ६ अपक्ष ८ असे इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.सोमवारी इच्छुक सर्व उमेदवारांनी आपला अर्ज प्रभागनिहाय लागत असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून भरला अर्ज भरण्याचा कालावधी १२ ते १९ नोव्हेंबर पर्यंत असा होता परंतु काही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आॅनलाइन प्रक्रियेत तांत्रिक कारणाने अडकला त्यामुळे त्यांनी एक दिवसाची मुदत वाढवून मागितली. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन फॉर्म भरून घेतले. १९ रोजी दुपारी तीन वाजता एबी फॉर्म पक्षाचा अधिकृत उमेदवाराला जोडण्यासाठी दिला. भारतीय जनता पाटीर्चे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिल्यानंतर वेळ संपली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस वाढवून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी ११९ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:15 PM
पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टी ८ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ शिवसेना १ अपक्ष १ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
ठळक मुद्देशेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी १६ तर नगरसेवक पदासाठी १२८ उमेदवार रिंगणातभाजपा, राष्ट्रवादी व शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषितउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस मुदतवाढ