शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

जळगाव जिल्ह्यात पीकविम्याच्या १२ कोटींच्या रक्कमेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:15 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दोन दिवसांची मुदत

ठळक मुद्दे किती क्लेम प्रोसेस केले माहिती मिळेनाबँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावा

जळगाव : जिल्ह्यातील शेतकºयांकडून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविम्याच्या हप्त्यापोटी शेतकºयांच्या पीककर्जातून कपात केलेल्या रक्कमेपैकी १२ कोटी रूपयांच्या रक्कमेबाबत घोळ आहे. जिल्हा बँकेकडून ओरिएंटल इन्शुरन्स या विमा कंपनीला ही रक्कम भरण्यासोबत माहितीही वेळेवर भरली असल्याचा दावा केला जात असून कंपनीकडून मात्र या रक्कमेतून किती शेतकºयांचे क्लेम प्रोसेस केले? याची माहिती मिळत नसल्याचे हा घोळ निर्माण झाला आहे.सोमवार, ९ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत हा विषय समोर आल्याने जिल्हाधिकाºयांनी जिल्हा बँक व विमा कंपनीला याबाबत शहानिशा करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यात २०१७ मध्ये खरीप हंगामात एकूण ८५ हजार ५७८ शेतकºयांचा ११ कोटी ३९ लाख ७७ हजार ५९२ हेक्टर क्षेत्राचा ४५३ कोटी ४८ लाख ९३ हजार ५६६ रूपयांचा विमा उतरविण्यात आला होता. त्यासाठी शेतकºयांनी १६ कोटी ३३ लाख २९ हजार ६२३ रूपयांचा विमा हफ्ता भरला होता. तर रब्बी हंगामात ४ लाख ४१ हजार ८०२ रूपयांचा हफ्ता भरला होता. मात्र विमा कंपनीकडून आलेल्या याद्यांमध्ये अनेक गावांमधील शेतकºयांची नावेच वगळली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तर अनेक शेतकºयांना नुकसान होऊनही विम्याचा लाभ पुरेसा मिळाला नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा बँक उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे तसेच विमा कंपनीविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला होता. अशाच काही तक्रारींबाबत सोमवार, ९ जुलै रोजी झालेल्या पीक विमा आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यात १२ कोटींच्या रक्कमेबाबत घोळ असल्याचे आढळून आले आहे.याबाबत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने पीकविम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमियम) शेतकºयांकडून १२ कोटी रूपये गोळा केले. ते भरणा केले. मात्र ओरिएंटल कंपनीच्या म्हणण्यानुसार जिल्हा बँकेने त्याबाबत आॅनलाईन माहितीचा भरणा ३१ जुलै २०१७ पर्यंत करणे आवश्यक असताना तो केलेला नाही. तर माहितीचा भरणा वेळेवर केला असल्याचे जिल्हा बँकेचे म्हणणे आहे. बँकेच्या माहितीवर विमा कंपनीने प्रोसेस केली की नाही? किती खातेदारांच्या माहितीवर प्रोसेस केली व किती खातेदारांच्या माहितीवर केली नाही? याची शहानिशा होत नसल्याने दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. प्रोसेस केलेली नसेल तर फौजदारी कारवाई केली जाईल.बँकेने पैसे व माहिती मुदतीत भरल्याचा दावाजिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने २०१७ च्या हंगामात ७२ हजार शेतकºयांचे विमा हप्त्याचे १२ कोटी रूपये विमा कंपनीला (ओरिएंटल इन्शुरन्स) मुदतीत पाठविले आहेत. माहितीही मुदतीत पाठविली आहे. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. विमा कंपनीकडूनच घोळ झाला आहे. कंपनीने पाठविलेल्या पहिल्या यादीत शेतकºयांची नावे होती ती दुसºया यादी नाहीत. त्याचे उत्तर कंपनी देऊ शकत नाही. पैसे भरलेले असल्याने विमा देणे (नुकसान भरपाई) कंपनीची जबाबदारी आहे.विमा कंपनीकडून २० कोटीची भरपाई२०१७च्या खरीप हंगामातील जिल्हा बँकेच्या सभासद १७ हजार ४१० शेतकºयांना विमा कंपनीकडून फक्त १९ कोटी ९० लाख ५९ हजाराची भरपाई मिळाली आहे. त्यापैकी १६ हजार १२० सभासदांच्या नावावर १९ कोटी ८ लाख ३३ हजरांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाJalgaonजळगाव