चोपडा : येथील मराठा समाज नागरी पतसंस्थेमध्ये चेअरमन, व्यवस्थापक व लिपिक यांनी संगनमताने ११,९२,४११ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत लेखपरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मराठा समाज नागरी पतसंस्था मर्या चोपडा या पतसंस्थेमध्ये चेअरमन किरणकुमार देवीदास देशमुख, व्यवस्थापक मनोज बंसीलाल विसावे, लिपिक चंद्रशेखर देवीदास देशमुख सर्व. रा. चोपडा यांनी सदर पतसंस्थेमध्ये ठेवीदार यांचे दैनिक ठेव रुपये १,८६,९५० तसेच बनावट मुदत ठेव तारण कर्ज रुपये ४५००० तसेच बनावट ठेव तारण कर्जावरील कमी घेतलेले व्याज ९,५९,५४१ रुपये अशा एकूण ११,९१,४९१ रुपयांचा अपहार करून संस्थेची फसवणूक केली म्हणून लेखापरीक्षक संदीप पुंडलीक पाटील (४४) रा. जळगाव यांच्या फिर्यादीवरून चेअरमन किरणकुमार देवीदास देशमुख, व्यवस्थापक मनोज बनंसीलाल विसावे लिपिक तथा कॅशियर चंद्रशेखर देवीदास देशमुख यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहेत.