शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

12 डॉक्टर्सना बजावल्या नोटीसा

By admin | Published: April 18, 2017 12:20 AM

बोगस डॉक्टर शोध मोहीम : पाचो:याच्या पथकाला अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी

पाचोरा : शहर  व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कार्यक्रम शासनाच्या आदेशानुसार सुरू असून आजपावेतो शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50  डॉक्टरांची तपासणी केली. यापैकी 12 जणांच्या त्रुटी आढळल्याने  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी त्यांना नोटीस जारी केल्या आहेत.याबाबत प्राप्त माहिती अशी की , शासनाच्या वैद्यकीय सेवेसंदर्भात ठरवून दिलेल्या निकषानुसार डीएचएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना होमिओपॅथीचीच प्रॅक्टीस करणे गरजेचे असते मात्र काही डॉक्टर्स आयलोपॅथीची उपचार पद्धती अवलंब करीत आहेत हे बेकायदेशीर आहे. तसेच ब:याच ठिकाणी बीईएमएस पदवी धारकांना हा व्यवसाय करण्यास परवानगी नाही तरीही सर्रासपणे आर एम पी सारखे बोगस पदवीधर दवाखाने थाटून सर्रासपणे बेकायदेशीपणे वैद्यकीय सेवा करीत आहे आणि जनतेच्या जिवाशी खेळत आहेत यामुळे नको ते उपचार होऊन रुग्ण अधिक संकटात सापडत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे शासनास शोधमोहीम घेणे भाग पडले आहे. पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागासाठी शोध पथक स्थापन केले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, तहसीलदार बी. ए. कापसे, पाचोरा एपीआय सचिन सानप यांचे नेतृत्वाखाली बोगस डॉक्टरशोध पथक तपासणी सुरू आहे ग्रामीण भागात आजपयर्ंत नागरदेवला पिंपळगाव हरे, लोहार, कलमसरे, शिंदाड नांद्रा कुरंगी लोहटार, भोजे कुर्हाड बालद, अंतुर्ली आदी ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वाघ यांनी दिली  दरम्यान ग्रामीण भागात बरेच ठिकाणी बोगस डॉक्टर आहेत मात्र पथक येणार म्हणून अगोदरच असे डॉक्खर सावध झाल्याने तपासणी अभियानाचा फज्जा उडवित आहे. पाचोरा शहरातदेखील शोध मोहीम सुरू असून दवाखान्यामध्ये अप्रशिक्षित कर्मचा:यांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. त्यातच रुग्णांना योग्य सुविधा न देता काही जण प्रचंड लूट व कट प्रॅक्टस करीत आहे. शहरात पाचोरा  ग्रामीणरुग्णालयाचे डॉ मंदार करंबलेकर यांचे नेतृत्व खाली तपासणी सुरू आहे.  ही तपासणी व शोध मोहीम यापुढेही सुरूच राहील काही तक्रारी असल्यास  नागरिकांनी कळवाव्यात. - डॉ मंदार करंबेळकर, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पाचोरा  नागरिकांनी बोगस डॉक्टर संदर्भात माहिती द्यावी नाव गुप्त ठेवले जाईल, तसेच काही बाबी न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.-डॉ समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी,  पाचोरा  बोगस डॉक्टर शोध मोहीम चांगली असून डॉक्टर असोसिएशनचे पूर्ण सहकार्य आहे शासन निर्णयाप्रमाणे तपासणी करणे अपेक्षित आहे. -डॉ. रुपेश पाटील , पाचोरा डॉक्टर असो.अध्यक्षबोगस डॉक्टर शोध मोहिमेत पथकाने पारदर्शकता ठेवावी , डॉक्टरांच्या अडचणी समजून घ्याव्यात ,शासनाने काही नियम शिथिल करणे आवश्यक आहे .-डॉ. भूषण मगर