जळगाव : पोलिस प्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जाणारे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जळगाव जिल्ह्यातील १२ पोलिस अधिका-यांसह कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे.
पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. बुधवारी राज्याचे पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार सन २०२२ च्या महासंचालक सन्मानचिन्ह पदकाची यादी जाहीर झाली आहे.
त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय हरिदास पवार, नरेंद्र हिरालाल कुमावत, पोलिस उपनिरीक्षक विनयकुमार देसले, पोहेकॉ. रवींद्र धोंडू घुगे (लाप्रवि), सचिन सुभाष विसपुते, सुनील अर्जुन माळी, मनोज काशिनाथ जोशी, राजेश प्रभाकर चौधरी, सुनील माधव शिरसाठ, पोना.विजय अशोक दुसाने, अल्ताफ सत्तार मन्सुरी, अमोल भरत विसपुते यांचा समावेश आहे.