जळगाव : शेतात गेलेला असताना सर्पदंश झाल्याने रोहित भायला बारेला (१२, रा. चोरगाव, ता. धरणगाव, मूळ रा. देवीदुगाने , मध्यप्रदेश) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरगाव येथे घडली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर रोहितच्या आईने प्रचंड आक्रोश केला.मध्यप्रदेशातील देवीदुगाने येथील बारेला कुटुंबीय हे दोन वर्षांपासून चोरगाव येथे स्थायिक झाले आहे. तेथे ते डॉ. नितीन चाचरे यांच्या शेतात काम करून उदरनिर्वाह करतात. गुुरुवार, ३० आॅगस्ट रोजी रोहितचे आई-वडील शेतात गेलेले असताना रोहित हा त्यांच्या मामेभावासह शेतात गेला होता. काही वेळाने त्याचा मामेभाऊ धावत आला व त्याने रोहीतला काहीतरी झाल्याचे वडिलांना सांगितले. त्यावेळी त्यांनी घटनास्थश्ळी धाव घेतली असता तो खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. या विषयी डॉ.चाचरे यांनाही माहिती देण्यात आली. डॉ. चाचरे, रोहीतचे मामा करण बारेला, राहुल सोनवणे, रामसिंग सोनवणे यांनी तत्काळ रोहीतला जिल्हा रुग्णलयात हलविले. मात्र येथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
चोरगाव येथे सर्पदंशाने १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 9:27 PM
शेतात गेलेला असताना सर्पदंश झाल्याने रोहित भायला बारेला (१२, रा. चोरगाव, ता. धरणगाव, मूळ रा. देवीदुगाने , मध्यप्रदेश) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरगाव येथे घडली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर रोहितच्या आईने प्रचंड आक्रोश केला.
ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोशबारेला कुटुंबिय मूळ मध्यप्रदेशातीलचोरगाव येथे झाले होते स्थायिक