जळगाव : जिल्हाभरातील कोरोना बाधित गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे़ जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाच्या माहितीवरून समोर आली आहे़ मृतांची संख्याही वाढत आहे. त्यात गंभीर रुग्णांचा वाढलेला आकडा चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे़ दरम्यान, शुक्रवारी जळगाव शहरात ५४ रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे़ शुक्रवारी के़ सी़ पार्क या नव्या भागात रुग्ण आढळून आला आहे़ तर तेली चौकात ५ बाधित रुग्ण आढळले आहेत़शहरातील बाधित मृतांची संख्याही वाढत असून गेल्या दोन दिवसात दोन बाधितांच्या मृताची नोंद झाली आहे़ यात शुक्रवारी ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला़ यासह तालुक्यातही एका ४५ वर्षीय प्रौढाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
वीस टक्के रुग्ण जळगाव शहरातजून महिन्यात शहरात झपाट्याने रुग्ण वाढून रुग्णसंख्या थेट ६०६ वर पोहोचली आहे़ जिल्हाभरातील रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहे़ त्यात मृतांचा आकडाही जळगावातच अधिक आहे़शहरातील या भागात आढळले रुग्ण२२ रुग्णांचा अहवाल हा गुरूवारी रात्री आलेला होता़ त्यानंतर शुक्रवारी आलेल्या माहितीनुसार के़ सी़ पार्क, कानळदा रोड या परिसरातील एक रुग्ण बाधित आढळून आला़ यासह तेली चौक, मारूती पेठ भागात ५, मेहरूण व राधाकृष्ण नगर प्रत्येकी २, अयोध्यानगर, गणेशकॉलनी, गेंदालाल मिल, प्रत्येकी एक अशा १३ रुग्णांचे पत्ते समोर आलेले आहेत़ उर्वरित रुग्णांची माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आलेली नव्हती़