जळगाव: कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेत सलग दुसऱ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. मात्र जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुवर्णनगरीत १०० ते १२५ कोटींच्या सुवर्ण व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. (125 crore business stalled in two days in Suvarnagar, result of public curfew)कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.जनता कर्फ्युची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने व्यापारी बांधवांनीही करोडो रुपयांच्या उलाढालीचा विचार न करता आपली दुकाने बंद ठेवली. यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली आहे. जळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात.
सुवर्णनगरीत दोन दिवसांत १२५ कोटींचा व्यवसाय ठप्प, जनता कर्फ्यूचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 7:53 AM