शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

आठवडाभरात कोरोनाच्या १२६३ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका हा फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो, असा अंदाज शहरातील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका हा फेब्रुवारीपर्यंत राहू शकतो, असा अंदाज शहरातील काही डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्या अंदाजानुसारच आता जिल्हाभरात फेब्रुवारीत मोठी रुग्णवाढ समोर येत आहे. यात १५ ते २२ फेब्रुवारी या आठवडाभरात १२५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे रुग्णवाढ होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोना शांत होता. रुग्णसंख्या शंभराच्या खाली असल्याने सर्वांना दिलासा होता. यामुळे कोरोना संपलाय असाही गैरसमज झाल्याने बेफिकिरी वाढली होती. जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा दौरा, या बाबी आता रुग्ण वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले असून नागरिकांनी आता अधिक दक्ष राहणे गरजेचे झाले आहे. रविवार आणि सोमवार या दोन दिवसात चार महिन्यांतील उच्चांकी वाढ नोंदविण्यात आली आहे. एकत्रित सर्वत्र कोरोना वाढत असताना जळगावात यंत्रणा पुन्हा सज्ज झाली आहे.

गंभीर रुग्ण कमी असल्याचा दिलासा

रुग्णवाढ समोर येत असली तरी यात गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. अधिकांश रुग्णांना लक्षणे नसणे, सौम्य लक्षणे असणे यामुळे हे रुग्ण होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. तज्ज्ञांच्या मते होम आयसोलेशनचे नियम न पाळल्यानेही कोरोनाचा धोका वाढत आहे.

वाढत जाणारी रुग्णसंख्या

५७५९१ : आठवड्यापूर्वीची रुग्णसंख्या

५८८५४ : आठवड्यानंतरची रुग्णसंख्या

१२६३ : रुग्णांची वीस दिवसात भर

९०० : सक्रिय रुग्ण वाढले

असा राहिला आठवडा

सोमवारी - १२४

मंगळवारी - ६३

बुधवारी - ७४

गुरुवारी - १६९

शुक्रवारी - १५२

शनिवार - १४६

रविवार - २१६

सोमवार - ३१९

स्वतंत्र पॉइंटर

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आढळलेले रुग्ण हे पूर्ण जानेवारी महिन्यात आढळलेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहेत.

जानेवारीत आढळलेले रुग्ण : १११३

फेब्रुवारीत आढळलेले रुग्ण : १७२०

१ ते १५ फेब्रुवारीपर्यंतचे रुग्ण : ४५७

१५ ते २२ फेब्रुवारीपर्यंतचे रुग्ण : १२६३