भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या चाळीसपैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे शेळी पालकांमध्येमध्ये खळबळ उडाली आहे .ऐन दिवाळी व भीषण दुष्काळात हा प्रकार घडल्यामुळे शेतकºयाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत किन्ही येथील पशुवैद्यकीय अधिकारी सातपुते यांनी उर्वरित शेळ्यावर उपचार केले असून, मयत शेळ्यांचा पंचनामा तलाठी मिलिंद देवरे यांनी केला. शेळ्यांचे शवविच्छेदन करून अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती शेळीपालन मालक पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. शेळ्या नेमक्या कशामुळे दगावल्या याबाबत मात्र अद्यापही निश्चित कारण समजू शकले नाही.दरम्यान , शिंदी येथे दर रविवार व बुधवार या दिवशी मटणाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. येथे परिसरातील गावातून मटण घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र येथे विषबाधेमुळे शेळ्या दगावल्याची चर्चा परिसरात झाल्याने रविवारी मटणाच्या दुकानावर शुकशुकाट दिसून आला.
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे विषबांधेमुळे १३ शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:51 PM
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या चाळीसपैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देसुमारे एक लाखाचे नुकसानऐन दिवाळी व दुष्काळात शेतकरी संकटातमटणाच्या दुकानावर शुकशुकाट