जळगाव : जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून ईव्हीएम मशिन व इतर आवश्यक साधन सामग्री केंद्रांना गुरूवारीचं रवाना करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी २३ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली होती. निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे निवडणूकीसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ९६ ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.
१३ लाख ४९२३ मतदार
जळगाव जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकीसाठी १३ लाख ४९२३ मतदार आहेत. त्यामध्ये ६ लाख २६ हजार ७ महिला तर ६ लाख ७८ हजार ९०६ पुरूष मतदार आहे. इतर १० मतदार आहेत. शुक्रवारी मतदान मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच मतदान करण्यासाठी सुट्टी किंव दोन तासांची सवलत देण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत.
असे आहेत तालुका निहाय मतदार
जळगाव (१०८४३६), जामनेर (१३४१८३), धरणगाव (६१३८०), एरंडोल (६४४३०), पारोळा (७०६१८), भुसावळ (६७८५८), मुक्ताईनगर (७६३००), बोदवड (३४५२०), यावल (९५०२७), रावेर (८३५२४), अमळनेर (६८२७१), चोपडा (८५४५८), पाचोरा (१५४७३८), भडगाव (५४२६८), चाळीसगाव (१४५९१२).