जळगाव : राष्ट्रीय महामार्ग व साईडपट्टय़ांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात होत असल्याची गंभीर दखल शुक्रवारी जिल्हा दौ:यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी घेतली. महामार्ग दुरुस्तीचे तत्काळ निर्देश त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिल्यानंतर प्राधिकरणाने महामार्ग दुरुस्तीसाठी 10 कोटींचा प्रस्ताव तातडीने तयार केला असून तो मंजुरीसाठी दिल्ली येथे प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात दुरुस्तीचे काम सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्यात 87 टक्के भूसंपादन झाले असून 13 टक्के भूसंपादन बाकी आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यातून महामार्ग जाणार आहे, त्यापैकी एकाही तालुक्यात 100 टक्के भूसंपादन झालेले नाही. 40 पैकी 35 लाख क्षेत्र ताब्यात चौपदरीकरणाच्या या कामासाठी 40 लाख 81 हजार 779 चौ.मी. क्षेत्र संपादीत करावयाचे होते. त्यापैकी आतार्पयत 35 लाख 71 हजार 578 चौ.मी.क्षेत्र ताब्यात घेण्यात (87.50 टक्के)आले आहे. भूसंपादनासाठी 325 कोटी 99 लाख 37 हजार 380 एवढा निधी प्राप्त झाला आहे. पैकी 299 कोटी 91 लाख 29 हजार 250 एवढा निधी शेतक:यांना वाटप करण्यात आला आहे.पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर ‘नही’ गतिमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौपदरीकरणाबाबत मुंबईत घेतलेल्या बैठकीत भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी शहरवासी व अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी महामार्गाची दैना झाल्याने त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गावर होत असलेल्या वाढत्या अपघाताबाबत ‘लोकमत’ने त्यांचे लक्ष वेधल्याने त्यांनी महामार्गाच्या दुरुस्तीचे तातडीने निर्देश दिले होते. त्यानंतर ‘नही’गतिमान झाली. ‘नही’च्या अधिका:यांनी शनिवारी तातडीने 10 कोटींचे अंदाजपत्रक तयार करून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नवी दिल्लीकडे मंजूरीसाठी पाठविले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
13 टक्के भूसंपादन बाकी : फेब्रुवारीत होणार दुरुस्ती
By admin | Published: January 22, 2017 12:27 AM