जळगाव / नशिराबाद : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे आठवडे बाजारासाठी बकऱ्या घेऊन जाणाऱ्या दोन मालवाहू वाहनांना भुसावळकडून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना समोरून जोरदार धडक दिल्याने चार जण नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाल्याची भीषण घटना बुधवारी पहाटे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.फैजपूर येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात बकरी खरेदी-विक्री केली जाते. याच व्यवसायासाठी भडगाव येथून एम. एच.-४३ बीबी ००५० आणि जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) येथून एम. एच.-४३ एडी १०५१ ही दोन्ही मालवाहतूक वाहने फैजपूरकडे जात होती. या दोन्ही वाहनांमध्ये १५ जण सहा ते सात बकऱ्यांसह प्रवास करीत होते. या वेळी भुसावळकडून येणाऱ्या ट्रकने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या दोन्ही मालवाहतूक वाहनांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मालवाहतूक वाहनामधील अकील गुलाब खाटीक (४०, रा. फैजपूर), नईम अब्दुल रहिम खाटीक (६२, रा. बिलाल चौक, तांबापूरा), फारूख मजीद खाटीक (४२, रा. भडगाव), जुनेद सलीम खाटीक (१८, रा. भडगाव) हे उड्डाणपुलाच्या खाली फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले.
नशिराबाद उड्डाणपुलावर अपघात, १३ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 2:05 PM