लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गुरुवारी १३४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जळगाव ग्रामीणमध्ये ३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत, मात्र, दुसरीकडे ६० रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत. ग्रामीण भागातही रुग्ण घटत आहे.
जिल्ह्यात गुरूवारी १६ बाधितांचा मृत्यू झाला. यात जळगाव शहरातील ७० व ८० वर्षीय पुरुष व ८६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. तर पाचाेरा, रावेर, भडगाव, बोदवड,मुक्ताईनगर येथे प्रत्येकी २, यावल तालुक्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या २२८८ वर पोहोचली आहे.
चाचण्या घटल्या
गुरुवारी ३६४६ चाचण्या झाल्या. ज्या नियमीत चाचण्यांपेक्षा तीन पटीने कमी आहेत. आरटीपीसीआरचे २२९० अहवाल आले त्यात ३५८ बाधित समोर आले. आरटीपीसीआरचे २७१४ अहवाल तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
सक्रिय रुग्ण ९५४९
लक्षणे असलेले २५२०
लक्षणे नसलेले ७०२०
ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणारे रुग्ण : १२४०
अतिदक्षता विभागातील रुग्ण ७५८