जळगाव : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. तीन दिवसात गावठी व देशी-विदेशी दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 13 लाख 65 हजार 654 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांकडून कारवाईची आढावा घेवून मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले.जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सी.पी.निकम, चाळीसगावचे निरीक्षक आर.एस.सोनवणे, भरारी पथकाचे निरीक्षक सी.एच.पाटील, पुरनाड सिमा तपासणी नाक्याचे निरीक्षक बी.बी.देवकाते, दुय्यम निरीक्षक जी.बी.इंगळे, एम.पी.पवार, जी.जी.अहिरराव, बी.बी.सूर्यवंशी, एम.बी.सोनार, डी.एल.जगताप व खोंडे यांचे स्वतंत्र पथक तयार केले होते. या पथकाने जिल्ह्यातील सर्व सिमा तपासणी नाके, राष्ट्रीय व राज्य मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी केली. तसेच भुसावळ, जळगाव ग्रामीण भागात गावठी दारुच्या भट्टय़ा उद्ध्वस्त केल्या.सहारिया यांनी साधला संवादराज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांशी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांनी कारवाईची माहिती दिली. यावेळी विक्रीकर विभागाच्या अधिका:यांशीही त्यांनी संवाद साधला. कारवाईबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, विभागीय उपायुक्त पी.पी.सुर्वे हे देखील मोहीमेबाबत दैंनदिन आढावा घेत असल्याची माहिती एस.एल.आढाव यांनी दिली.
आचारसंहितेत 14 लाखाचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: February 03, 2017 12:39 AM