ऑनलाईन लोकमत
जामनेर,दि.18- जिल्हा परिषद शाळेत शिकणा:या विद्याथ्र्याना गणवेशाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. 400 रुपयांच्या गणवेशाच्या रकमेसाठी 2 हजार रुपये जमा करुन खाते उघडायला पालक तयार नाही, तर ङिारो बँलन्स वर खाते उघडायला बँक तयार नसल्याने तालुक्यातील सुमारे 14 हजार विद्यार्थी अनुदानापासून वंचित आहेत.
जि.प. शाळेत पहिली ते आठवी र्पयत शिक्षण घेणा:या दारिद्रय रेषेखालील व मागासवर्गीय मुले व सर्व मुलींना शासनाकडून मोफत गणवेश दिले जात असतात. या योजनेतील गैरप्रकार गैरप्रकार टाळण्यासाठी या वर्षापासून गणवेशाची रक्कम 400 रुपये थेट विद्याथ्र्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी बँकांनी शालेय विद्याथ्र्यांचे खाते झीरो बँलन्सने उघडावीत असे आदेश शिक्षण विभागाने सर्व बँकांना दिले आहेत. मात्र बँका या आदेशाचे पालन करीत नसल्याने आतार्पयत तालुक्यातील पात्र 17 हजार 586 विद्याथ्र्यापैकी केवळ 3 हजार 170 विद्याथ्र्याची खाती उघडली गेली आहेत. अजूनही 14 हजार 416 विद्यार्थी खाते उघडू शकलेले नाहीत. गणवेश रक्कम वाटपासाठी 70 लाख 34 हजार इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा झालेली आहे.
शालेय विद्याथ्र्याचे खाते ङिारो बॅलन्सद्वारे उघडावेत असे आदेश जिल्हा अग्रणी बँकेला देण्यात आले आहेत. ज्या बँका आदेशाचे पालन करणार नाही, त्यांची तक्रार पालकांनी जि.प. कडे करावी.
बी. जे. पाटील, शिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव.
जि.प. शाळेत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याचे खाते बँकांनी ङिारो बॅलन्सने उघडणे गरजेचे आहे. मात्र बँका सहकार्य करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी गणवेश अनुदानापासून वंचित आहेत.
जावेद मुल्लाजी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, जामनेर.