भुसावळ : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या तिस:या टप्प्यात भुसावळ तालुक्यातील 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी दिली.दरम्यान, तिस:या टप्प्यात निवड झालेल्या या 14 गावांसाठी येत्या 22 एप्रिलपासून शिवार फेरी हा कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे शिवार फेरीचा हा कार्यक्रम 30 एप्रिलर्पयत चालेल.यानंतर 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये जलयुक्तच्या कामांना मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती झांबरे यांनी दिली.शिवार फेरीवेळी कृषी, महसूल, पंचायत समिती आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत़ शेतक:यांनी सूचविलेल्या कामांची हे प्रतिनिधी पाहणी करून त्याची तांत्रिक बाब तपासतील आणि 1 मे च्या ग्रामसभेत सूचविण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना मंजुरी देण्यात येईल, असे झांबरे यांनी सांगितले. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतर जलयुक्तच्या कामांना सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे पाणी अडवण्यास मदत होणार असून त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणावर लाभ होणार आह़े जलयुक्तसाठी निवड झालेली गावे अशीजाडगाव, साकरी, हतनूर,सावतर, मन्यारखेडे, वरणगाव, वांजोळे, मिरगव्हाण, निंभोरा खुर्द ,दर्यापूर, साकेगाव, मांडवे दिगर, पिंप्रीसेकम, भिलमळी या गावांची निवड झाली.1 मेच्या ग्रामसभेत मिळणार मंजुरी..!22 एप्रिलपासून जलयुक्तसाठी निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरीला सुरुवात झाली आह़े 30 एप्रिलर्पयत शिवार फेरी सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले त्यानंतर 1 मेच्या ग्रामसभेत कामांना मंजुरी देण्यात येईल.
14 गावांची जलयुक्तसाठी निवड
By admin | Published: April 24, 2017 1:05 AM