धुळे : शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या हालचाली गतिमान झाल्या असून 1400 नोंदणीकृत हॉकर्सचे आजपासून बायोमेट्रिक सव्रेक्षण केले जाणार आह़े त्यानंतर संबंधित हॉकर्सला ओळखपत्र देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार आह़े हॉकर्स झोनचा विषय जागेबाबत सुचविण्यात आलेले फेरबदल करून पुन्हा महासभेला सादर केला जाणार आह़े गेल्या वर्षी मे महिन्यात आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी आग्रा रोडवरील हॉकर्सला पळवून लावले होत़े काही दिवस पोलीस बंदोबस्त तैनात करून आग्रा रोड मोकळा करण्यात आला होता़ परंतु काही दिवसातच परिस्थिती या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठाणे येथील एजन्सीला सहा महिन्यांची मुदत दिली जाणार आह़े दुसरीकडे हॉकर्स झोनसाठी मनपा प्रशासनाने सुचविलेल्या काही जागांना महासभेत विरोध झाल्याने नव्याने सुचविण्यात येणा:या जागांचा समावेश करून हा प्रस्ताव नव्याने महासभेसमोर ठेवला जाणार आह़े महासभेत हॉकर्स झोनसाठीच्या जागा अंतिम झाल्यानंतर तत्काळ हॉकर्सच्या पुनर्वसनाला सुरुवात केली जाईल़ दुसरीकडे महासभेचा ठराव शासनाला सादर करून हॉकर्स व नो हॉकर्स झोन निर्मितीबाबत मंजुरी घेतली जाईल़ त्यानुसार हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन जाहीर केले जातील़ हॉकर्स झोनचा प्रश्न सोडवितानाच पार्किगचा प्रश्नदेखील प्राधान्याने सोडविण्याचा विचार केला जात आह़े
1400 हॉकर्सचे बायोमेट्रिक सव्रेक्षण!
By admin | Published: February 23, 2016 12:19 AM