जळगाव : महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून गुरुवारी विविध संवर्गातील १४६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात ६६ लिपिक, २२ मंडळ अधिकारी, ५८ अव्वल कारकून यांचा समावेश आहे.तसे पाहता ३१ मे रोजी बदल्या होणार होत्या. मात्र एक दिवस अगोदरच महसूल विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. या मध्ये सर्वाधिक संख्या लिपिकांची असून या मध्ये मंडळाधिकाºयांची संख्या केवळ २२ आहे. या सोबतच जळगाव तालुक्यातील १० तलाठी व जामनेर तालुक्यातील १५ तलाठ्यांच्याही बदल्या झाल्याची माहिती मिळाली.मे महिना उजाडण्यापूर्वीच महसूल विभागात बदल्यांचे वारे वाहू लागले होते. दरवर्षी प्रत्येक जण सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यानुसार यंदाही हे प्रयत्न सुरू होते. मात्र बदल्या करताना ठिकाण मागावे लागले नाही, हे विशेष. बहुतांश जणांना सोयीचे होईल, अशाच ठिकाणी बदली झाली असल्याचे चित्र या बदल्यांवरून आहे.नायब तहसिलदारांच्या शासनाच्या निर्देशानुसार रिक्त पदांवर बदल्या करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगावात ‘महसूल’च्या १४६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:06 PM