जळगाव : गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत १४,९४० कोरोना रुग्ण आणि संशयित रुग्णांनी १०८ या रुग्णवाहिकेचा वापर करत, रुग्णालयात दाखल केले आहे. मार्च, २०२१ या एकाच महिन्यात तब्बल १,३१७ एवढ्या कोरोना रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला आहे.
जानेवारी, २०२१ ते १२ एप्रिल, २०२१ या काळात २,१३० कोरोना रुग्ण आणि संशयितांनी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला आहे.
जानेवारी महिन्यात ४८, फेब्रुवारीत १४५, तर मार्चमध्ये १,३१७ रुग्णांना या रुग्णवाहिकेने मदत केली आहे. एप्रिल महिन्यात १२ एप्रिलपर्यंत ६२० कोरोना रुग्णांनी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला आहे.
सध्या जिल्ह्यात १०८ या क्रमांकासाठीच्या ३५ आणि आदिवासी प्रकल्प विभागाच्या ४ रुग्णवाहिका आहेत. त्यातील ३८ रुग्णवाहिका या कोविड रुग्णांसाठीच ठेवण्यात आल्या आहेत. सध्या १३ एप्रिलपासून दररोज सुमारे ८० पेक्षा जास्त फोन या रुग्णवाहिकांसाठी येत आहेत. प्रत्येक रुग्णवाहिका दिवसाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयात पोहोचवत आहे.