यावल, जि. जळगाव, दि. 22 - अल्पभूधारक शेतकरी नसताना व खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करीत जवाहर विहीर योजनेचे अनुदान लाटल्याप्रकरणी यावलचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पं़स़चे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़माजी आमदारांसह लोकप्रतिनिधींविरुद्ध गुन्हासंशयित आरोपींमध्ये माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा विलास पाटील, पं़स़चे माजी उपसभापती हर्षल गोविंदा पाटील, माजी नगराध्यक्षा वंदना तुकाराम बारी यांच्यासह योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी गुलाम रसूल अ़नबी, हबीब गुलाम रसूल, राजेश माधवराव राणे तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ़एकनाथ धनाजी लोहार, तत्कालीन तहसीलदार व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, तत्कालीन तलाठी अ़गनी शेख रहेमान, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी एस़व्ही़चौधरी, तत्कालीन उपविभाग अधिकारी सिंचन आऱओ़नारखेडे, पंचायत समितीचे शाखा अभियंता क़ेएस़ झोपे, जि़प़ लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता ए़एस़खडसे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आऱएऩमहाजन (जि़प़लघु सिंचन) यांचा समावेश आह़े बाळासाहेब कोलते यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आह़े
जवाहर विहीर अनुदान योजनेत भ्रष्टाचार, माजी आमदार व निवासी उपजिल्हाधिका:यांसह 15 जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: April 22, 2017 5:41 PM