जळगाव : न्यायालयाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून भाडे वसूल करून, गाळे लिलाव करण्याचा सूचना दिल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर मनपाने ८१ ब ची नोटीस बजावली. त्यानंतर देखील वर्षभरापासून गाळेधारकांकडून गाळेभाडे भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता पोरखेळ बंद करून १५ दिवसांच्या आत थकीत गाळे भाडे भरण्याचा अल्टीमेटम मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गाळेधारकांना दिला.मनपाच्या मुदत संपलेल्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी शुक्रवारी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान,आमदार सुरेश भोळे, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, नगरसेवक भगत बालाणी, राजेश वरयानी, मनोहर नाथानी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.राज्य शासनाने मनपा अधिनियमातील ७९ ड मध्ये बदल केला आहे. त्यामुळे मनपा अधिनियमातील बदल जळगावच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांना कितपत लागू होतो याबाबतची विचारणा करण्यासाठी गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी गाळेधारकांना खडेबोल सुनावले व तत्काळ थकीत गाळे भाडे भरण्याचा सूचना दिल्या.एक पट भाडे वसुली केली तरी १५० कोटी द्यावेच लागतीलआयुक्तांच्या आक्रमक भूमिकेनंतर गाळेधारकांनी सावध पवित्रा घेत, मनपाकडून ५ पट भाडे वसूल केले जात असून त्यात थोडी घट करून एक पट भाडे वसूल करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी हा निर्णय महासभा घेईल. तसेच जरी एक पट भाडे वसुली करण्यात आली तरी गाळेधारकांना १५० कोटी रुपये द्यावेच लागणार आहेत. सध्या ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. त्यापैकी गाळेधारकांनी केवळ २२ कोटी रुपयेच भरली आहे. आता न्यायालय गाळेधारकांना उभे देखील करणार नाही. त्यामुळे आधी थकीत भाडे भरा अशा सूचना आयुक्तांनी गाळेधारकांना दिल्या आहेत.बैठक घेवून भाडे भरण्याबाबत निर्णय घेवू - गाळेधारकांची भूमिकादोन दिवसात सेंट्रल फुले मार्केटमधील सर्व गाळेधारकांची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत थकीत भाडे भरण्याबाबत सर्व व्यापाऱ्यांना सूचना देण्यात येतील असे फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी यांनी सांगितले.शासनाकडे तोडगा काढण्याबाबत प्रस्ताव पाठविणार -सुरेश भोळेयाप्रकरणी तोडगा काढण्यावर आमचा भर राहणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सुरेश भोळे यांनी सांगितले.आयुक्त म्हणाले - हायकोर्ट मी चालवत नाहीउच्च न्यायालयाने गाळेधारकांकडून भाडे वसूल करून, गाळे जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यायालयाने निर्णय देवून वर्ष लोटले असून तरीही गाळेधारक भाडे भरायला तयार नाही, उच्च न्यायायलयात जर का कुणी याचिका दाखल केली तर गाळेधारकांचे प्रचंड नुकसान होईल असे सांगत आयुक्तांनी आता कोणतीही सबब न सांगता थकीत भाडे भरण्याचा सूचना दिल्या. आयुक्तांच्या सूचनेनंतर गाळेधारकांनी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी हायकोर्ट मी चालवत नाही असे सांगत थकीत भाडे भरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे गाळेधारकांना सांगितले.गाळेधारक म्हणाले आम्ही तोडगा काढूआयुक्तांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गाळेधारकांचे प्रतिनिधी म्हणाले, आम्ही तोडगा काढू. त्यावर आयुक्तांनी कोण गाळेधारक असे सांगत, हायकोर्टात तुम्ही काय करु शकता? असा सवालही आयुक्तांनी त्यांना केला....तर मी तुरुंगात जावू का ?आता उच्च न्यायालयात कोणी याचिका दाखल केली तर मनपा आयुक्त म्हणून मलाच उत्तर द्यावे लागणार आहे. एकीकडे मनपा कर्मचाºयांचे वेतन थकीत राहत असून त्यांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न देखील आयुक्तांनी उपस्थित केला. तसेच हायकोर्टाने काही अॅक्शन घेतल्यास ‘तर मी तुरुंगात जावू का? असे आयुक्त चंद्रकांत डांगे म्हणाले.
जळगावातील गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी १५ दिवसांचा ‘अल्टीमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 1:13 PM
मनपा आयुक्तांनी सुनावले खडेबोल
ठळक मुद्देवर्षभरापासून टाळाटाळ, आता कोणतीही सबब सांगू नकागाळेधारक म्हणाले आम्ही तोडगा काढू