सुशील देवकरजळगाव : शासनाकडून कर्जमाफीच्या योजनेत सातत्याने बदल करणे सुरूच असल्याने नियमित कर्ज फेडल्याने या योजनेचा लाभ मिळू न शकलेले सुमारे दीड लाख शेतकरी योजनेच्या निकषात आणखी बदल होऊन लाभ मिळेल, या आशेने थकबाकीदार झाले आहे. या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तब्बल १२०० कोटी रूपये थकविले आहेत. यास जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दुजोरा दिला.राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा करून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत ज्या शेतकºयांना कर्जवाटप झाले व जे ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार ठरले. ज्यांचे कर्ज ३१ जुलै २०१७ पर्यंत भरलेले नाही. ते शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र याचवेळी ज्या शेतकºयांना १ एप्रिल २०१६ नंतर कर्जवाटप झाले ते मात्र या कर्जमाफीसाठी पात्र झाले नाहीत. त्यांची कर्जभरण्याची अंतीम मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत होती. तर ज्यांना १ एप्रिल २०१७ नंतर कर्जवाटप झाले. त्यांना कर्जफेडीसाठीची अंतीम मुदत ही ३१ मार्च २०१८ ची होती. मात्र या मुदतीपर्यंतही आधीच्याच कर्जमाफी योजनेचा घोळ सुरू असल्याने व निकषांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने नियमित कर्ज भरल्याने या योजनेचा लाभ न मिळालेल्या या शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या. त्यांनीही नियमित कर्जफेडीचा आगाऊ पणा न करता थकबाकी ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे.अजूनही वर्षभर चालणार घोळकर्जमाफी योजनेच्या निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे या योजनेचा घोळ आणखी वर्षभर चालण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.कर्जवसुली ठप्पजिल्हा बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे दीड लाख शेतकºयांनी जिल्हा बँकेचे १२०० कोटी रूपये थकविले आहेत. त्यामुळे कर्जवसुली ठप्प झाली आहे.योजनेतील बदलांबाबतही प्रश्नचिन्हशासनाने कर्जमाफी योजनेत बदल केले असून पूर्वी घरटी एक लाभार्थी ग्राह्यधरून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती. ती सरसकट सर्व अर्जदारांना करण्याचा बदल केला. मात्र योजनेच्या निकषांनुसार अनेक कुटुंबातील अन्य सदस्यांनी कर्जमाफी योजनेला कुटुंबातील एकच सदस्य पात्र असल्याने बाकीच्या सदस्यांनी अर्जच भरलेले नव्हते. त्यांचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शासन त्याबाबत काय भूमिका घेते? याबाबतही उत्सुकता आहे.
जळगाव जिल्ह्यात नियमित कर्जफेड करणारे दीड लाख शेतकरी झाले थकबाकीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:04 PM
कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा
ठळक मुद्देजिल्हा बँकेचे थकविले १२०० कोटीकर्जवसुली ठप्प