मुक्ताईनगर : मुक्ताईनगर वनपरिक्षेत्राअंतर्गत जामनेर तालुक्यातील मुंदखेड शिवारालगतच्या वनहद्दीत पंधरा नीलगायी दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषबाधेमुळे बुधवारी या वन्यप्राण्यांनी जीव गमावला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.इतक्या मोठ्या संख्येने नीलगायी दगावण्याची या वनपरिक्षेत्रारील ही पहिलीच घटना आहे. वनविभागाने घनस्थळ गाठून मृत वन्य प्राण्यांचे पंचनामे केले. शपशुवैद्यकीय अधिका-यांमार्फत घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. नीलगायींच्या मृत्यचे कारण शोधेण्यासाठी आम्ही त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला असून शुक्रवारी नाशिक येथील फॉरेन्सिक लॅब येथे पाठविण्यात येणार आहे.मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत जामनेर तालुक्यातील मुंदखेडलगतच्या भागात ही घटना घडली असून, यात १५ नीलगायी दगावल्या आहेत. विषबाधेने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. -आशुतोष बच्छाव,वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर
१५ निलगायींचा मृृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 3:35 PM