- भूषण श्रीखंडे
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या १५ शाळा हायटेक होणार आहे. असून यासाठीच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत १२ कोटी २३ लक्ष ५५ हजार ६४७ इतका निधी मंजूर झाला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी शासन स्तरावर हा प्रस्ताव सादर केला होता.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व सोयी सुविधा मिळाव्या यासाठी जिल्ह्यातील आदर्श शाळांसाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविला होता. मंजूर निधीतून भौतिक सुविधांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला मुलींकरता स्वतंत्र व पुरेशी स्वच्छतागृहे, पेजल सुविधा व हँडवॉश स्टेशन, ग्रंथालय, संगणक कक्ष, व्हर्चुअल क्लासरूमची सुविधा व शाळेला संरक्षण भिंत अशा सुविधा शाळांमध्ये या निधीतून होणार आहे. त्यामुळे शिक्षणासोबत मुलांचे शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे.
या शाळांना निधी..पिलखेडा उच्च प्राथमिक शाळा ८४ लक्ष ७६ हजार, म्युनिसिपल स्कुल नंबर १९ उच्च प्राथमिक शाळा ६० लक्ष ४५ हजार, पाळधी उच्च प्राथमिक शाळा ४५ लक्ष ६५ हजार, पारंबी उच्च प्राथमिक शाळा १ कोटी ९७ लक्ष ७२ हजार, जुने गाव उच्च प्राथमिक शाळा २ कोटी १ लक्ष ५४ हजार, गळखांब उच्च प्राथमिक शाळा ५० लक्ष ४५ हजार, टोणगाव, यशवंत नगर उच्च उर्दू प्राथमिक शाळा ४५ लक्ष ६५ हजार, सिद्धेश्वर - वरणगाव उच्च प्राथमिक शाळा ८८ लक्ष ८ हजार, कोल्हाडी उच्च प्राथमिक शाळा ५६ लक्ष ६६ हजार, माळ शेवगे उच्च प्राथमिक शाळा ४७ लक्ष ४५ हजार, गरताड उच्च प्राथमिक शाळा ७० लक्ष ४५ हजार, विखरण उच्च प्राथमिक शाळा ३३ लक्ष ४९ हजार, उर्दू उच्च प्राथमिक शाळा तोंडापूर ६० लक्ष १६ हजार, पुणगाव उच्च प्राथमिक शाळा ९५ लक्ष २६ हजार व विचखेडे उच्च प्राथमिक शाळा ८५ लक्ष ७३ हजार अशा १५ शाळा आहे.