जळगाव : तालुक्यातील भादली बु. येथील हत्याकांड प्रकरणात आतार्पयत पोलिसांनी 152 जणांची चौकशी केली तर 40 जणांचे लेखी जबाब नोंदविले आहे. असे असले तरी पोलिसांच्या हातात अद्यापर्पयत ठोस माहिती हाती आलेली नसली तरी चौघांची हत्या करणारे हे दोन पेक्षा जास्त जण असल्याचा संशय पोलिसांना आहे.20 मार्च रोजी झालेल्या भादली हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. 21 दिवसानंतरही मारेकरी सापडत नसल्याने पोलिसांवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने मारेक:याचे नाव सांगणा:याला पोलीस प्रशासनाने 25 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. चौकशीत प्रतिसाद मिळाल्याने बक्षीसाच्या रकमेत आणखी 25 हजाराची वाढ करण्यात आली. दरम्यान, दररोज 4 ते 5 जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत गावक:यांच्या बोलण्यात वारंवार तफावत आढळून येत आहे. या मुद्यावर केली जात आहे चौकशीभोळे कुटुंबाचा कोणाशी वाद झाला आहे का?, भोळेंच्या प}ीचा विवाह गावातील असल्याने त्याचा काही संबंध आहे का?, भोळे यांच्यामुळे कोणाचे नुकसान झाले आहे, शेती घेणारा व कसणारा यांच्यात कोणाचे नुकसान होणार होते? तसेच चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडीमुळे कोणाचे नुकसान, शेतीची थोडीफार रक्कम मिळाली होती व त्याचाही कुठे संबंध येतो का? तसेच चाळीसगाव दरोडय़ाचा संबंध आहे का? या व अन्य माहितीवर चौकशी केली जात आहे. दरम्यान, मारेक:यांना काही जणांनी पाहिले असल्याचा संशय असून मारेक:यांनी त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली असावी म्हणूनच नाव सांगण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असाही कयास पोलिसांना आहे.फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबकडून घटनास्थळ व परिसराची तपासणी करुन काही नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. घटनेच्या दिवशी ठसे तज्ज्ञांकडूनही ठसे घेण्यात आले तर श्वान पथकाकडूनही तपासणी करण्यात आली. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके रात्रंदिवस काम करीत आहेत. उशीरा का असेना परंतु, हा गुन्हा आम्ही उघडकीस आणूच. त्यादृष्टीने काही धागेदोरे मिळाले आहेत. नातेवाईकांपासून तर शेजारी व संशयास्पद व्यक्तींची चौकशी करुन जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत.-डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षकपोलीस अधीक्षकांनी घेतला आढावापोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी नशिराबाद येथे जाऊन या हत्याकांडाचा पहिल्या दिवसापासून केलेल्या तपासाचा आढावा घेतला. त्यात सहा पथकांनी काय चौकशी केली, त्यात त्यांच्या हाती काय माहिती मिळाली. पुरावे काय मिळाले, अजून गावातून काय माहिती मिळू शकते याबाबत सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल व सहायक निरीक्षक राहूल वाघ आदी उपस्थित होते. आतार्पयत 152 जणांची चौकशी व 40 जणांचे लेखी जबाब घेण्यात आल्याचे सुपेकर यांनी सांगितले.
152 जणांची चौकशी अन् 40 जणांचे जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:37 AM