जळगाव- शहरातील अत्यंत वर्दळीच्या कोर्ट चौकातील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वल्र्ड या मोबाईल दुकानातून 16 लाख 37 हजार 500 रुपयांचे 114 नवीन मोबाईल लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरुवारी रात्री 12 ते 2़13 वाजेर्पयत एका अल्पवयीन चोरटय़ाने पूर्ण दुकान साफ केले. तो चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाला आह़े त्याच्या शोधासाठी चार पथके तयार करण्यात आली असून ती रवाना झाली आहेत. चोरटा जिल्हाबाहेरील असल्याचा पोलिसांना संशय आहे. रात्रंदिवस वर्दळ असलेल्या या चौकातून चोरटे चोरी करीत असल्याने त्यांना पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे या घटनेवरुन सिद्ध होते. ‘सीसीटीव्ही’मुळे चोरटय़ाने तोंडाला बांधला रूमालराजेंद्र बारी यांच्या मोबाईल दुकानातील आतील भागात तीन सीसीटीव्ही कॅमेरे आह़े यातील प्रत्येक कॅमे:यात चोरटा व चोरीचा प्रकार कैद झाला आह़े चोरटय़ाने रात्री 11़57 ला दुकानात प्रवेश केला़ तो अल्पवयीन असल्याचे कॅमे:यात दिसत आहे. त्याने सोबत एक मोठी पांढरी पिशवी तसेच स्क्रू ड्रायव्हर, कटर, बॅटरी हे साहित्य आणले होत़े सीसीटीव्ही कॅमे:यात चेहरा दिसू नये व ओळख पटू नये म्हणून चोरटय़ाने तोंडाला रूमाल बांधला होता.कटरने सील कापून फक्त नवीन 114 मोबाईल लांबविलेचोरटय़ाने सर्व दुकानात पाहणी केली़ मोबाईल असलेल्या ठिकाणी जाऊन सोबतच्या कटरने सील कापले व मोबाईल ताब्यात घेतले. सव्वा दोन तासात दुकानातील विविध कंपन्यांचे प्रत्येकी 20 ते 25 हजार रुपये किमतीचे असे दुकानातील सर्व नवीन 114 मोबाईल लांबविल़े सर्व मोबाईलचे खोके दुकानात पडलेले होत़े पहाटे 2़14 वाजता चोरटय़ाने पुन्हा शटर वाकवून हातातील पिशवी बाहेर फेकली व तो बाहेर पडला़चोरटय़ाचे भ्रमणध्वनीवर संभाषणचोरी करत असताना चोरटा तीन ते चार वेळा त्याच्याजवळील मोबाईलवरून त्याने कुणाशी तरी संभाषण केल़े 12 वाजता चोरटय़ाने फोन केला़ यानंतर 1़25 वाजता आणि बाहेर पडताना फोन केला़. तो बाहेरील कुण्या व्यक्तीकडून दुकानातील साहित्याची माहिती घेत असावा असा पोलिसांना संशय आह़े त्यादृष्टीनेही तपास सुरु आहे. मोक्षदा पाटील यांनी दुकानादाराकडून माहिती जाणून घेतली़ तसेच येत्या दहा दिवसात दुकानात आलेल्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना दिल्या.सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून येत असलेला चोरटा अस्पष्ट दिसत आह़े त्याचे स्पष्ट छायाचित्र तयार करण्याचे काम सुरू आह़े घटनेच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह कर्मचा:यांची चार पथके तयार केली आह़े तसेच परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याच्या सूचना केल्या आहेत़ रेकार्डवरील गुन्हेगारांचीही माहिती काढण्यात येत असून लवकरच हा गुन्हा उघडकीस आणू़ - डॉ़ जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक़ज्या पध्दतीने या घटनेत चोरी केली आहे, त्याच पध्दतीने जिल्ह्यात इतर घटना घडल्या आहेत काय?त्याचा अभ्यास करण्यात येईल़ इतर जिल्ह्यांमध्ये संपर्क साधण्यात येईल़ दुकानात कोणआले, कोण गेले त्याची माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना केल्या आहेत़ लवकरच चोरटय़ास अटक करण्यात येईल.-मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक़
कोर्ट चौकातून 16 लाखांचे मोबाईल लंपास
By admin | Published: April 08, 2017 12:46 AM