लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून शुक्रवारी ८ हजार चाचण्यांमध्ये १६९ कोरेाना बाधित आढळून आले आहेत. हे प्रमाण कमी असून मृत्यूची संख्याही घटून ४ वर आली आहे. विशेष बाब म्हणजे शुक्रवारी जळगाव शहरात एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. शहरात २० नवे रुग्ण आढळले आहेत.
शहरासह जिल्हाभरात रुग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. दुसरीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यानंतरही बाधितांचे प्रमाण मात्र, कमी होत असल्याने संसर्गच घटला आहे. असे चित्र आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू कमी होत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये मृतांचे प्रमाणही कमी झाले आहे. यासह गंभीर रुग्णांची संख्याही घटली आहे. सद्यस्थितीत ५८२ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून ३२० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये बेड खाली असून अनेक रुग्णालयांनी कोविड सेंटर बंद केले आहे.