मुक्ताईनगर : गेल्या तीन वर्षात तालुक्यात 17 शेतक:यांनी नापिकी व कजर्बाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अशात 17 पैकी अवघ्या पाच शेतकरी कुटुंबांना शासनाची मदत मिळाली तर चक्क 12 कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावला आहे. शेतक:यांवर निसर्गापाठोपाठ प्रशासनदेखील आसुड ओढवत असल्याचे हे चित्र वेदनादायी असून कर्ता शेतकरी कुटुंब नायक गेल्यानंतर किमान शासनाकडून मिळणा:या मदतीवर आस लावून बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक अंधारात कष्टाच्या तिमिरीशिवाय पर्याय नाही. जिल्हास्तरावरून शेतकरी आत्महत्या दाबल्या जात असल्याचा आरोप आहे. शासनाकडे दाखल आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मार्च 2014 ते मार्च 2017 दरम्यान 17 आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला मात्र यापैकी अवघे पाच प्रस्ताव मंजूर झाले. मोठा गाजावाजा करून शासन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत देत असल्याचा आव आणला गेला, तर 12 बाधित कुटुंबीयांचे प्रस्ताव फेटाळत त्यांना आर्थिक मदत नाकारण्यात आली. दिलेल्या मदतीमध्ये एक लाखाच्या आर्थिक मदतीत फक्त 30 हजारांचा धनादेश तर 70 हजार वारसाच्या नावाने पोस्टात जमा केले जातात. या तुटपुंज्या मदतीस होणारे हेलपाटेदेखील असहनीय आहेत. मार्च 2014 ते 17 दरम्यान आत्महत्या केलेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)या शेतक:यांनी केली आत्महत्या.. मंजूर प्रकरण- प्रताप मुरलीधर काटे (सारोळा),मीराबाई विठ्ठल पाटील (सुळे), रघुनाथ उखडरू चव्हाण (टाकळी), गणा राघो इंगळे (भोटा), बाळू सखाराम फरदळे (निमखेडी खु.।।). अपात्र प्रकरणे- गणेश पंढरी कोळी (सारोळा), रवींद्र त्र्यंबक पाटील (वडवे), विनोद कडू कोळी (महालखेडा), श्रावण बाळू लोखंडे (रुईखेडा), संतोष नारायण गव्हाण (पारंबी), शांताराम नारायण ताटे (कु:हा),रुखमाबाई मुरलीधर चौधरी (निमखेडी बु.।।), शांताराम श्रीराम झाल्टे (पिंप्राळा), युवराज चांगो खंडारे (इच्छापूर), गंभीर अजरुन जगताप (सारोळा), अंबादास ओंकार टिळे (सातोड), साहेबराव गोपाळ पवार (धामणगाव).
17 शेतक:यांच्या आत्महत्या
By admin | Published: April 15, 2017 12:29 AM