जळगाव : जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात पूर्ण दिवसभर घेतलेल्या आढाव्यानंतरही जिल्ह्यातील कोरोनाने होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला यश येत नसल्याचे गंभीर चित्र आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जिल्ह्यातील १७ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जणांचे वय ५० पेक्षाही कमी आहे.जळगाव जिल्ह्याचा मृत्यूचा आलेख वाढतच आहे. हा मृत्युदर देशाच्या मृत्यू दरापेक्षा चारपट आहे. जिल्ह्यात १०२ जणांचे मृत्यू झाल्यानंतर अखेर वरिष्ठ पातळीवरुन या गंभीर प्रकारची दखल घेण्यात आली. व आरोग्य मंत्र्यांनी आठ ते साडे आठ तासांचा वेळ देत विविध बैठका घेत कोविड रुग्णालय प्रशासनाची कानउघाडणी केली.त्यानंतर विविध समित्या गठीत करण्यात आल्या. त्यात टास्क फोर्स व डेथ आॅडिट कमिटी व यामध्ये खासगी तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता. या कमिटीमुळे आरोग्य विभागावर वचक राहणार आहे.देशात सर्वात जास्त मृत्यू दरदेशात जळगावातील कोरोनाचा मृत्यूदर हा सर्वात जास्त म्हणजे १०.४ इतका आहे. त्या खालोखाल नंदुबार १० आणि धुळे ९ असा मृत्यूदर आहे. देशाचा मृयूदर हा २.८ तर राज्याचा ३.४ इतका आहे.असे झाले मृत्यू६ जून- एक वृद्ध, एक तरुण५ जून- दोन पुरुष, एक महिला७ जून- चार पुरुष, एक महिला८ जून- तीन पुरुष, एक महिला९ जून- दोन पुरुष, एक महिला१०३ मृत्यूंपैकी आम्ही आजपर्यंत ७० केस पेपरची तपासणी केली आहे. लवकरच सर्व निष्कर्ष काढून आम्ही या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहोत.- डॉ.दीपक पाटील, अध्यक्ष, डेथ आॅडिट कमिटी.अन्य व्याधी१४ पैकी ८ रुग्णांना मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते. ६ रुग्णांना अन्य कसलाही आजार नसल्याची नोंद नाही. चोपडा तालुक्यातील ३९ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.उपचार सुरु असताना मृत्यू- मृतौपैकी १३ जणांचे मृत्यू हे रुग्णाला दाखल केल्याच्या २ ते ६ दिवस या कालावधीत झाले आहे.-भुसावळ तालुक्यातील एका महिलेला दुपारी १२ वाजता दाखल केले आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता या महिलेचा मृत्यू झाला.-रुग्ण उशिरा येत असल्याचा यंत्रणेच्या दाव्यावर या आकडेवरीने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.-मृत्यूसंख्या ११६ - जिल्ह्यात कोरोना बधितांचे मृत्यू संख्या ११६ झाली आहे.
पाच दिवसात बाधित १७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:03 AM