ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14 - चोपडा येथून चंद्रपूरला जाणारी 18 लाख रुपये किमतीची बनावट देशी दारु व 10 लाख रुपये किमतीचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे महामार्गावर जळगाव येथे गुजराल पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून पकडला. चालक राजेंद्र सुरेश खारकर (वय 26, रा.वांजळी, ता.वणी जि.यवतमाळ), शीतल सुखदेव ब्राrाणे (वय 38, रा. बल्लारशा, जि.चंद्रपुर) व ट्रक मालक धनराज उरकुडा चाकले (वय 38 रा.वरोरा, चंद्रपूर) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आजर्पयतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पहाटे तीन वाजता हा सापळा यशस्वी झाला.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दारु बंदी असलेल्या चंद्रपुर व वर्धा जिल्ह्यात चोपडा येथून बनावट देशी दारुची वाहतूक होत असून शनिवारी रात्री दारु हा ट्रक रवाना होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी तीन पथके तयार करुन त्याची विभागणी केली. एक पथक चोपडा, दुसरे धरणगाव व तिसरे एरंडोलजवळ तयार ठेवले. तर कुराडे हे स्वत: महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ थांबले होते.दरम्यान, हा माल नेमका कुठून आला, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा पोलिसांकडून शोध सुरुआहे.