यावल, जि.जळगाव : डांभुर्णी येथे पोलीस ताफ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी अटक केलेल्या १८ महिला आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला आहे.तालुक्यातील उंटावद फाटा येथे एका गंभीर खुनाच्या आरोपीताला पोलीस कर्मचारी पोलीस वाहनातून घेऊन जात होते. तेव्हा डांभुर्णी गावातील रहिवाशांनी पोलीस ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस गाडीचे नुकसान झाले होते. तसेच अनेक पोलीसदेखील जखमी झाले होते. दि ५ एप्रिल रोजी ह्या गुन्ह्यातील अनेक आरोपीताना अटक करण्यात आली होती. त्यात महिला व पुरुष आरोपीतांचा समावेश होता. २९ रोजी भुसावळ येथील अतिरिक्त फौजदारी न्यायालयाने यातील १८ महिला आरोपीतांचा अर्ज फेटाळला होता. या आदेशाच्या विरोधात या १८ महिलांनी औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता.ऍडव्होकेट जितेंद्र विजय पाटील यांनी या प्रकरणात जळगाव येथूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद केला. खंडपीठाच्या न्या. व्ही. के. जाधव यांच्या बेंचने कोरोनासारख्या भीषण संकट काळात सदर महिलांची दयनीय अवस्था लक्षात घेता मानवतावादी दृष्टिकोन बाळगत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद ऐकून घेऊन सदर जामीन मंजूर केला.
पोलीस ताफ्यावरील हल्ला प्रकरणी१८ महिलांचा जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:01 PM
पोलीस ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती.
ठळक मुद्देआरोपीला नेत असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला होताआधी भुसावळ येथील न्यायालयाने जामीन फेटाळला होता