शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

मेंढोळदे येथील १८० कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:13 AM

मुक्ताईनगर : पूर्णा व तापी नदी किनारीलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे, मुंढोळदे, नायगाव, पिंप्रीनांदू, ...

मुक्ताईनगर : पूर्णा व तापी नदी किनारीलगतच्या उचंदे गणातील पुरणाड, उचंदे , शेमळदे, पंचाणे, मुंढोदे, मुंढोळदे, नायगाव, पिंप्रीनांदू, बेलसवाडी, कर्की, पिंप्रीपंचम भागात २७ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक उद्‌भवलेल्या वादळाचा मोठा परिणाम झाला आहे. हजारो हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. तसेच अनेक घरांची , गुरांच्या गोठ्याची पडझड झाली. विजेचे खांब व तारा तुटल्याने परिसर अंधकारमय झाला. वादळामुळे मेंढोळदे येथील १८० कुटुंब उघड्यावर आल्याने त्यांच्या भोजनाची व्यवस्था आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच घर दुरुस्तीसाठी स्वखर्चातून १५ मिस्तरी व मजूर यांना कामाला लावले.

या नुकसानीची २८ रोजी सकाळी आठपासून आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागतिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक अशा शासकीय फौजफाट्यासह पाहणी केली.

यावेळी सरसकट पंचनामे करून तत्काळ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधितांना दिल्या. तसेच मुंढोळदे या गावातील सुमारे १८० च्या वर घरांचे पत्रे वादळात उडून गेले आणि मुसळधार पावसात भिजून सर्व डाळ, दाणा व अन्नाची नासाडी झाल्याने बुधवारी रात्रीपासून उपाशी पोटी असलेल्या गावकऱ्यांसाठी स्वखर्चातून सकाळ, संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली. ही जबाबदारी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले हे पार पाडीत आहेत. तसेच गावातील उदध्वस्त घरे तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभी करण्यासाठी आमदारांनी पदरमोड करून १५ मजुरांची टीम सहकार्यासाठी तत्काळ उपलब्ध केली.

यावेळी आमदारांसह काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, दिलीप पाटील, राजेंद्र तळेले, स्वीय सहायक प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी शेतकरी तसेच गावकरी उपस्थित होते.

शासनाकडून तत्काळ मदत मिळावी म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुख्य सचिव यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

फोटो कॅप्शन

उचंदा परिसरात पाहणी करताना आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, कृषी अधिकारी अभिनव माळी व इतर.

(छाया : विनायक वाडेकर)